राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण
दुरुस्ती प्रक्रिया
शासन निर्णय क्र. शिप्रधो २०१९ /प्र.क्र. ४३/प्रशिक्षण, दि.२०.७.२०२१ तील मुद्दा क्र.१ (क) नुसार राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक/माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांसाठी अनुक्रमे वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण दिनांक ०१ जून २०२२ पासून ऑनलाईन स्वरुपात व्यवस्थित सुरु आहे. सदर प्रशिक्षणासाठी प्रशिक्ष्णार्थ्यांनी केलेल्या नावनोंदणीतील त्रुटी दुरुस्तीसाठी दिनांक २२ जून २०२२ पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. सदर मुदतीत ज्या प्रशिक्ष्णार्थ्यांनी दुरुस्ती नोंदणी केली होती त्यांचे प्रशिक्षण व्यवस्थित सुरु आहे. सद्यस्थितीत राज्यातील एकूण ९४,५४१ शिक्षकांनी प्रशिक्षणासाठी नावनोंदणी केलेली होती. यानुसार आजतागायत एकूण ८८,५३९ प्रशिक्षणार्थ्यांनी आपले प्रशिक्षण पूर्ण करून प्रशिक्षण प्रमाणपत्र डाउनलोड करून घेतले आहे. उर्वरित प्रशिक्षणार्थी हे आपले प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अंतिम टप्प्यामध्ये आहेत.
एकंदरीत मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण सुरु असल्याने दुरुस्ती प्रक्रिया पुन्हा खुली केल्यामुळे प्रशिक्षण यंत्रणेवर ताण येवू नये यासाठी दिनांक २२ जून २०२२ नंतर पुन्हा मुदतवाढ देण्यात आली नाही. परंतु अद्यापही काही प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण अपूर्ण असल्याने व जवळपास ८८,५३९ प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्याने प्रशिक्षणार्थ्यांची माहिती दुरुस्ती प्रक्रिया पुन्हा खुली करण्यात येत आहे. यासाठी प्रशिक्ष्णार्थ्यांचे खालील ०४ गट करण्यात येत आहे,
१. प्रशिक्षण पूर्ण केलेले व प्रमाणपत्र डाऊनलोड केलेले प्रशिक्षणार्थी
२. प्रशिक्षण पूर्ण केलेले व प्रमाणपत्र अद्याप प्राप्त न झालेले प्रशिक्षणार्थी
३. प्रशिक्षणास लॉगिन केलेले पण प्रशिक्षण पूर्ण न केलेले प्रशिक्षणार्थी
४. प्रशिक्षणास अद्याप लॉगिन च न केलेले प्रशिक्षणार्थी
मोबाईल नंबर पडताळणी
अवैध OTP